तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील गावा गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती तसेच पौष्टिक करून धान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्याकरता कार्यक्रम राबविण्यात येत असून यावेळी मोजा कोपरआली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी सहायक प्रदीप मुंडे* यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धत तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याच्या बियाण्याच्या मिनी किट वाटप करण्यात आल्या व त्यांना एक प्रकल्प राबविण्यात सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री मडावी सर तसेच समस्त शिक्षक वृंद व मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक विचारपूस करण्यात आले आई फ्लू विषयी प्रतिबंधात्मक उपायाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आले व स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले
Related Articles
आता प्रत्येक नागरीकांना मिळणार आरोग्य संरक्षण कवच: डॉ ललित मल्लिक वैधकीय अधिक्षक मुलचेरा
मुलचेरा:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आता आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. जाणून घ्या कशी आहे हि योजना राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे […]
जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन*
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री […]
उदयाला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन
मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार […]