Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील 108 शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण

सन 2022-2023 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात 4 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत गणेशनगर येथील जिप प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहुर्ली पंचायत समिती मुलचेरा येथील सहायक शिक्षक श्री अशोक धाडूजी बोरकुटे,धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ट महाविध्याल,अहेरी उपजिल्हा रुग्णालय रोड दानशूर चौक अहेरी,तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली शाळेची सहायक शिक्षीका श्रीमती जयश्री विजय खोंडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर,तालुका कोरची जिल्हा गडचिरोली येथील सहायक शिक्षक श्री दिलीप रावजी नाकाडे राज्यातील 108 शिक्षकांसह गडचिरोलीतील 4 शिक्षकांना 5 सप्टेंबर 2023 शिक्षक दिनी मुंबईत कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2021-2022 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहे.

सन 2022-2023 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक 25 ऑगस्ट, 2023 रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात 37, माध्यमिक प्रवर्गात 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 19, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाईड साठी दोन असे एकूण 108 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय 1 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला आहे