ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन, रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन
सिरोंचा :- आपणास मंत्री होऊन २ महिने झाले. या कालावधीत विविध विकासकामे केली असून जनतेच्या विकासासाठी महायुती सरकार सक्षम आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा ना. आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी संजय मिना जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (आत्राम ), ग्रामपंचायत रंगय्यापल्लीच्या सरपंचा गौरक्काअर्का आदी मान्यवर उपस्थित होते.ना.धर्मरावबाबा आत्राम पुढे म्हणाले की, नवीन आरोग्य वर्धिनी केंद्र हा ग्रामीण रुग्णालयापेक्षा मोठे आहे. तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या जनतेला चांगला उपचार मिळेल. ४ कोटी २० लाख रूपये खर्च उभारलेल्या या इमारतीचे उदघाटन माझ्या
वाढदिवसानिमित्त भेट दिलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांना धन्यवाद देतो. उशिर झाला पण काम झाला असे ते म्हणाले. मला मंत्री होऊन २ महिने झाले. मी ६० ते ७० जनहिताची शिबिरे घेतली आहे. या भागात टॉवरची मोठी समस्या आहे. त्याला काही जणांचा विरोध आहे. तरीही टॉवर उभारण्याचे काम मी १०० टक्के करणारच असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले. ४ कोटी २० लाख रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. अजून काही निधी कमी पडल्यास मागणी करावी असे त्यांनी सांगितले. या केंद्रातून २७ हजार ६५० लोकांना आरोग्य सेवा मिळणार आहे. यामध्ये ३८ गावांचा समावेश आहे यामध्ये ८ उपकेंद्राची समावेश आहे असेही ते म्हणाले.
रंगय्यापली, नारायणपूर, मेडारम आदीमुक्तापूर, नगरम मद्दीकुंठा, जाणमपली, रामन्जापूर ,आरडा या गावांसाठी उपयोगी ठरणार असून रंगापल्ली आरोग्य केंद्रात १५ पदे मंजुरी आहेत. या प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लोकांनी याचा फायदा घ्यावा, काही सुविधांचा अभाव असल्यास माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आपणापर्यंत पर्यंत पोहोचू शकता असेही ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन नवीन जन्नमवार यांनी केले तर आभार डॉ. मडावी यांनी मानले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.