विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षाकडून घेण्यात येत असलेल्या सीईटीसाठी आता विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र मिळणार आहे.
यासाठी 89 काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार असून, परीक्षेसाठी सुमारे पाच हजार संगणक उपलब्ध केले जाणार आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या मदतीने या काॅम्प्युटर लॅबची उभारणी केली जाणार आहे.
पहा काय सांगितले उच्च व तंत्रशिक्षण विभागाने
तुम्हाला माहिती असेल, अनेकदा ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूर असले की प्रवास करून जावे लागते. यात प्रवासात काही अडचणी आल्यास परीक्षेला मुकण्याचीही भीती असते.
त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना थेट काॅम्प्युटर लॅबमधून प्रवेशपरीक्षा देता येणार आहे. यातील बहुतांश लॅबची सरकारी महाविद्यालयांमध्ये उभारणी केली जाणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून सीईटी सेलला 89 काॅम्प्युटर लॅब उपलब्ध होणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.