वाघाचा बंदोबस्त लवकर करा माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास निवेदनातून केली मागणी
मूलचेरा मध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी तर बकरी,बैलाला केले ठार
मूलचेरा तालुका अंतर्गत येत असलेल्या मार्कडा रेंज आणि पेंडीगुडम रेंज मध्ये गेल्या काही दिवसा पासून वाघाने गाय, बकरी, बैल यांच्या वर हल्ले केले आहेत आणि आत मार्कडा रेंज अंतर्गत येणाऱ्या बिट कोपरल्ली कंपार्टमेंट नंबर- 1525 येथील रा.विश्वनाथनगर,श्री. रणजित कुटीश्वर मंडळ,वय- 65,हा शेतकरी धान जमा करण्यासाठी आपल्या शेतात काम करत असताना अचानकपने वाघाने त्या शेतकऱ्यांवर झडप मारली असता शेतकरी कसाबसा आपला जीव वाचवन्यासाठी झाडावर चढला असता वाघाने पुन्हा झडप मारली त्यावेळी वाघाने शेतकऱ्याच्या पायाला पकडला असता तो पायाला गंभीर घाव झाले आहेत आणि ग्रामीण रुग्णालयात त्याच्या वर उपचार सुरू आहे.
अशा घटनेने संपूर्ण क्षेत्रातील गावकऱ्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे.आणि शेतीचे कामे सुरू असल्याने खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे वन विभागाने वाघाचा बंदोबस्त लवकर करावे आणि जखमी झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी.
ही विनंती उपवनसंरक्षक आलपल्ली यांना निवेदनातून माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांनी केली आहे.
,यावेळी माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद गडचिरोली श्री.युधिष्ठिर बिश्वास, प्रकाश दत्ता भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,बादल शाह जिल्हा सचिव भाजप, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, बंगाली आघाडी तालुका सचिव प्रदीप रॉय,हिमांशू हलदार,जितेंद्र डोर्लीकर इत्यादी गावकरी उपस्थित होते.