गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे, शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल .-  मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन
मुलचेरा- नुकतेच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इमर्जिंग ट्रेंड्स NCETSTSD-2024 या विषयावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यामानाने एक दिवसीय राष्ट्रीय परीषद घेण्यात आले, शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपल्या उद्द्घाटनीय भाषनात व्यक्त केले
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अनिल चिताडे, भारतीय ग्रंथालय संघ तसेच मुक्ला चे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, मुख्य मार्गदर्शन म्हणुन प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. संजय ढोबले प्रोफेसर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर, शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत झाकी आणि नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंजीत ए. मंडल है उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेची सुरूवात गोडवाना विद्यापीठाच्या गीताने झाले परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयामधुन जवळपास ३५० सहभागीनी नोंदणी केली होती. राष्ट्रीय परिषदेत प्राध्यापक तसेच ग्रंथपाल यांनी सहभाग घेतले, परिषदेमध्ये विज्ञान विषयाशी निगडीत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी भाग घेतले प्रत्येक विषयाचे प्रथम व व्दितीय पारितोषीक देण्यात आले. सदर परिषदेच्या प्रोसेडींग मध्ये एकुण ८७ शोधनिबंधकाचे सार प्रकाशित करण्यात आले, प्रोसेडींगचे आणि महाविद्यालयीन व्दिवार्षीकांक २०२१-२०२३ “ज्ञानदीप” चे प्रकाशन मान्यवराचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात मुख्यतः प्राचार्य डॉ. मनोरजंन मंडल, प्राचार्य डॉ. मृनाल खाडे, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, प्राचार्य श्यामराव बुटे, प्राचार्य डॉ. शरद पोकले, प्राचार्य डॉ. पी. के. सिंग, प्राचार्य डॉ. संजय फुलझले, प्राचार्य डॉ. फिरदौशी, सिनेट सदस्य डॉ. प्रविण जोगी, डॉ. संजय साबले, डॉ. प्रविण तेलखेडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेमध्ये एकुण ०३ तांत्रीक सेशन घेण्यात आले प्रथम सेशनला डॉ. संजय डोबले यांनी बहुविद्याशाखीय संशोधन आणि आव्हानेः नविन शैक्षणिक धोरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्दितीय सेशन मध्ये डॉ. मोहनजी खेरडे यांनी संशोधन आणि प्रकाशनमध्ये शैक्षणिक अखंडता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि शेवटच्या सेशनमध्ये शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत झाकी यांनी शाश्वत जैवविविधता या विषयावर पिपिटी व्दारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल तर संचालन डॉ. हरी शिवप्रसाद, आभार प्रदर्शन डॉ. अशोक शेंडे यांनी मानले. राष्ट्रीय परिषदेला यशस्वी करण्याकरिता परिषदेचे समन्वयक डॉ. हरी शिवप्रसाद तसेच सहसमन्वयक प्रा. गौतम वाणी, IQAC समन्वयक डॉ. शनवारे तसेच महाविदयालयीन प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.