गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.

मुलचेरा -:  सन 2023 मधील   मतदार यादीचे अद्यावतीकरण,  तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील,प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी प्रसेंजित प्रधान, निवासी उपजिल्हाधिकारी   सुनील सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.