आलापल्ली येथे भागवत कथेचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते शुभारंभ..!!
बालयोगी गोपालजी महाराज यांच्या भागवत कथेला भाविकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी पेंडाल फुल्ल..!!
आलापल्ली येथिल साईबाबा देवस्थान, समिती द्वारा आयोजित बालयोगी गोपालजी महाराज, कारखेड जि. वाशीम यांचा भागवत कथेचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभहस्ते काल संध्याकाळी दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाले, ह्या भागवत कथेला भाविकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला, पहिल्याच दिवशी भव्य पेंडाल तुडुंब भरले होते, ही भागवत कथा ७ दिवस चालणार आहे..!!
भागवत कथा ऐकणे हे पुण्याचे कार्य असून ह्या माध्यमातून चांगले संस्कार भावी पिढीला होणार असल्याने जुन्या पिढीसह युवकांनी ही मोबाईलचा मोहातून बाहेर येऊन भागवत कथेचा अवश्य लाभ घ्यावा व समाजात सकारात्मक बदल घडवावा असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले तसेच तब्बल अडीच तास भविकांसोबत खाली जमीनीवर बसून पहिल्या दिवसाची भागवत कथा ऐकली..!!
ह्यावेळी साईबाबा देवस्थान समिती, आलापल्ली तर्फे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, ह्यावेळी राजमाता राणी रुक्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा सह श्री. साईबाबा देवस्थान समितीचे सर्व सदस्य तसेच भविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!!