ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

LIC चा मोठा निर्णय ! – ओडिसा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना लवकर मिळणार क्लेम

एलआयसीच्या निवेदनानुसार, रेल्वे अपघातातील पीडितांना जास्त अडचणी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या एलआयसीच्या विमा पॉलिसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसीची दावा प्रक्रिया सुलभ केली जात आहे. म्हणजेच, या मृतांच्या नातेवाईकांना विम्याचा दावा करण्यासाठी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही.

*महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचा कृषी विषयाबाबत मोठा निर्णय*

तुम्हाला माहिती असेल, शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी आणि योग्य ते ज्ञान मिळावं यासाठी अभ्यासक्रमात कृषी विषय अंतर्भूत करावा असा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला होता. आता हाच विषय इयत्ता 6 ते 8 वी साठी बंधनकारक असेल अशी घोषणा महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

 *तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा*

केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी तूर आणि उडीद डाळीच्या साठेदारीवर मर्यादा लागू केली आहे. केंद्र सरकारने घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, आयातदार आणि मिलर्सकडे ठेवलेल्या तूर आणि उडीद डाळीवर स्टॉक मर्यादा लागू केली. यामुळे साठा कमी होईल, त्यामुळे तूर आणि उडदाचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात. ऑक्टोबरपर्यंत हि मर्यादा लागू करण्यात आली आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.