कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी
गडचिरोली 02 :- आतापर्यंत 1661 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी मुख कर्करोग 48, स्तन कर्करोग 12, गर्भाशयमुख कर्करोग 22 संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांचेवर पुढील तपासण्या करून तात्काळ औषधउपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.
दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्यामध्ये दिनांक 22 मार्च ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत कर्करोग तपासणी वाहन संपूर्ण जिल्यामध्ये फिरणार आहे.या वाहना मध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व मुखाचा कर्करोग इत्यादी तपासणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत करण्यात येणार आहे. तरी 30 वर्षा वरील जास्तीत जास्त लोकांनी या आपल्या तपासण्या करून कर्करोग मुक्त जीवन जगावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे यांनी केले आहे.
कॅन्सर व्हॅन फिरती कार्यक्रम
चामोर्शी 24 मार्च ते 27 मार्च,
मूलचिरा 28 मार्च,
एटापल्ली 1 एप्रिल ते 3 एप्रिल,
भामरागड 4, 5 एप्रिल,
अहेरी 7,8
सिरोंच्या 9 ते 11,
आरमोरी 15,16
वडसा 17 ते 19,
कुरखेडा 21,22
कोरची 23,24
धानोरा 25,26
गडचिरोली 28 ते 30
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद गडचिरोली
