दिनांक 19 एप्रिल 2023 ला स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशालेकरिता डॉ. विवेक जोशी सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविदयाल्याचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल उपस्थिती […]
गडचिरोली
महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे:भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन
पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न सिरोंचा:- शासन आपल्या दारापर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ महाराजास्व अभियानातून दिल्या जात आहे. हे अभियान सामान्य जनतेच्या हिताचे असून नागरिकांनी विविध योजनाबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा येथे तहसील कार्यालयामार्फत 18 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान […]
गोमणी येथे दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन
मुलचेरा-: तालुका महसूल प्रशासन च्या वतीने गोमणी येथे भगवंतरावं माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, भूमिहीन दाखले, उत्पन दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, राशन कार्ड, जेष्ठ व्यक्ती प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण होणार […]
महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते १५ शिलाई मशीन वितरण
राजेंनी डीजेच्या तालावर धरला ठेका! अहेरी तालुक्यातील महागाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहभागी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच यावेळी आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू महिलांना १५ शिलाई मशीन वाटप केले.याप्रसंगी उपस्थित […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी मूलचेरा येथील बाबूराव आत्राम यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक मूलचेरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.11 येतील रहवासी असलेले बाबुराव आत्राम यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी बाबुराव आत्राम […]
अनाथ मुलांना नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळणार १ टक्का आरक्षण – राज्य सरकारचा मोठा निर्णय (पार्ट १)
राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये १८ वर्ष पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावलेली मुलं नोकरीसाठी पात्र असतील अशी घोषणा राज्य सरकारने केली. पहा आणखी काय सांगितले राज्य सरकारने राज्य सरकारने दिलेल्या माहिती नुसार, अनाथांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षण एकूण रिक्त पदांच्या संख्येवर आणि प्रवेशासाठी […]
काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एड.कविता मोहरकर यांनी घेतली आ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट विविध विषयावर सविस्तर चर्चा केले माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचीही उपस्थिती
अहेरी:- काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या नवनियुक्त काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा एडव्होकेट कविता मोहरकर यांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची शनिवार 8 एप्रिल रोजी अहेरीच्या राजवाड्यात भेट घेऊन महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी व विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्रामही उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष बनण्याआधी […]
ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित
गडचिरोली,(जिमाका)दि.07: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2023 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून अहेरी तालुक्यातील पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती समाविष्ठ आहेत – ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र. 5 अनु. जमाती स्त्री राखीव), पल्ले(प्रभाग क्र.1 […]
मुलचेरा तालुक्यात भाजपाचा स्थापना दिवस साजरा
मुलचेरा:-तालुक्यात नेताजी सुभाषचंद्र बोस च्या मुख्य चौकात भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या नेतृत्वात श्री बादल शहा जिल्हा सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सुभाष गणपती जिल्हा सचिव,उत्तम शर्मा व्यापारी आ अध्यक्ष,शंकर दास कोषाध्यक्ष,श्यामल सरकार,सौरभ गणपती,दिलीप मंडल, प्रताप पाल, प्रवीण मंडल, रणजित शील, सुकुमार मंडल भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अहेरी नगर पंचायातच्या प्रभारी मुख्यधिकाऱ्याची नगराध्यक्षासह असभ्य वर्तवणूक, पोलीसात तक्रार दाखल
जातीवाचक शिवीगाळ केल्याचा नगराध्यक्षाचा आरोप अहेरी नगरपंचायत येथील प्रभारी मुख्याधिकारी दिनकर बाळाराम खोत यांनी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांच्या कक्षात जाऊन असभ्य वरवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नगराध्यक्षा कु.रोजा शंकर करपेत यांनी अहेरी पोलीस ठाण्यात प्रभारी मुख्यधिकारी विरुद्ध अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.मुख्याधिकारी खोत यांनी […]