नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री […]
मुंबई
जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांची मृतांना श्रद्धांजली नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त […]
नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीची बैठक नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]
बाजारगाव स्फोट दुर्घटनास्थळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण; मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन केले सांत्वन नागपूर, दि. १७ : नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटना आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य […]
बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन
नागपूर दि. १७ : नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण
जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव नागपूर, दि. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना दिले. मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजारगाव दुर्घटनास्थळाला भेट
दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील -उपमुख्यमंत्री नागपूर दि. १७ : नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. […]
नागपूर जिल्ह्यात दीड वर्षात पाच हजार कोटींची कामे प्रगतिपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरातील ७९२ कोटींच्या ५ उड्डाणपुलांचे भूमिपूजन; राज्यातील ६२९ कोटींच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती नागपूर दि. १७ : नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी वितरित नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी […]
सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग […]