गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न […]
मुंबई
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील राजेश येलपुला यांच्या कुटुंबाला दिला आधार
अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता […]
राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार
सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच […]
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार
विधमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर दि. 27 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर बोलतांना वनमंत्री श्री. […]
भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध
मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक विवरण महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. पोर्टलवरील https://sevaarth.mahakosh.gov.in ह्या लिंक वर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण पाहू शकतात, व प्रिंट करु शकतात. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांशी संवाद; आधुनिक शेतीबरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन
मुंबई दि २७ :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. […]
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि. २, ३ व ४ ऑगस्ट २०२३ रोजी विधिमंडळाचे कामकाज नियमितपणे होईल. विधानभवन येथे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात […]
नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत भोजन – कामगार मंत्री सुरेश खाडे
मुंबई : इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील बांधकाम कामगारांसाठी, १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना […]
आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : आयुर्वेद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार. शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तत्काळ भरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी मांडली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील विविध आयुर्वेद […]
समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल […]