श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार : मिलिंदा मोरागोडा मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज येथे दिली. उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश […]
मुंबई
आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे – राज्यपाल रमेश बैस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान ठाणे, दि. 28 : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे […]
जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन
जी-२० व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची जगातील प्रमुख हिरे उद्योग केंद्र असलेल्या मुंबईतील भारत डायमंड बोर्सला भेट मुंबई, 28 मार्च 2023 : भारतीय हिरे उद्योगाने आज, जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या (TIWG) च्या प्रतिनिधींना भारत डायमंड बोर्स (BDB) या मुंबईतील हिरे व्यापार केंद्राला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. जी 20 प्रतिनिधींना भारत डायमंड बाजार परिसरातील जागतिक दर्जाच्या […]
अन्नप्रक्रिया उद्योगाला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 27 : “कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी अन्नप्रक्रिया उद्योगावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज अमेरिकेतील इनग्रॅडिएन्ट कॉर्पोरेशनच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जीम झॅली यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर […]
कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी – राज्यपाल रमेश बैस
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे भूमिपूजन संपन्न अलिबाग, दि. 27 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी ‘स्किल इंडिया मोहिमे’ची घोषणा केली. त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमिपूजन समारंभ दिमाखात संपन्न होत आहे, ही बाब राज्यासाठी […]
‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुंबई, दि. 27 : महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान ‘उमेद’ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून लवकरच याचा निर्णय घेण्यात येईल, असेही […]
लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा मुंबई, दि. 27 :- लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बिपीन […]
कृषी पायाभूत सुविधा निधी योजना
शेतकऱ्यांना कापणीच्या हंगामानंतर व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्याज अनुदान आणि आर्थिक सहाय्याद्वारे मध्यम-दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करुन कृषी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधीला मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत बँक आणि वित्तीय संस्था, प्राथमिक कृषी पत संस्था (पीएसीएस), विपणन सहकारी […]
विधानसभा प्रश्नोत्तरे
खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, दि.२३ : विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची […]