ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये. असे असतानाही जर बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल, तर अशा बॅंकावर गुन्हे दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याची खरीप हंगाम नियोजन सभा आज पार पडली. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस […]

अंतरराष्ट्रीय गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या निकाल महाराष्ट्र मुंबई राज्य राष्ट्रीय विदर्भ

कर्नाटक विजयाचा मुलचेरा काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव साजरा

भाजपची उलटी गिनती सुरू- प्रमोद गोटेवार मुलचेरा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक कोपरल्ली चेक चौकात ढोल – ताशे वाजवत आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मोठी बातमी ! – राज्यात उन्हाचा चटका वाढणार – हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मोठी बातमी ! – राज्यात उन्हाचा चटका वाढणार – हवामान खात्याकडून अलर्ट जारी देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांसह मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशातच येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. देशातील अनेक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

चंद्रपूर : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्‍या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वनविभागाने बोपचे यांच्‍या कुटूंबास ५ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन

गडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीरामध्ये 10 वी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. २६ :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

Sarkari Yojana योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला

 योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला Sarkari Yojana | महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम : या उमेदवारांना मिळणार दरमहा ४० हजार !

राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे […]