मुंबई, दि. 18 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर […]
राज्य
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांच्या मेळाव्याचे उद्घाटन मुंबई, : मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. तसेच महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे […]
गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
नक्सल्यानी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. […]
देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत
मुलचेरा-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या दानविर स्वभावाने देवनगर येथील […]
प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविले जाणार;आ.धर्मराव बाबा आत्राम यांची ग्वाही
बोलेपल्लीत संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत मुलचेरा-आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा चौथ्या दिवशी परत मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे पोहोचली. या ठिकाणी गावातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. सुरुवातीला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून […]
सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नारेडेको’ च्या प्रदर्शनाचा समारोप मुंबई दि. 3 : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट […]
राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. […]
शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार
राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषिपंप, मार्च 2022 पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषी फिडर सौर उर्जेवर आणणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली, त्या बैठकीत हे निर्णय […]
माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी देवनगर येथील हृदय रोग पीडित गौतम बिश्वास यांना केले आर्थिक मदत
मुलचेरा:- तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास मागील बरेच दिवसापासून हृदय रोगापासून ग्रस्त होते.घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. देवनगर येथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी सदर माहिती माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहचवले दानशूर राजा यांनी आर्थिक मदत दिली. माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप […]