ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मनोरंजन राज्य विदर्भ

वृद्ध साहित्यिक व कलाकारांनी मानधन योजनेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; कलाकार मानधन योजना

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे. सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महिलांच्या सक्षमीकरणासोबतच सुरक्षित वातावरणही महत्त्वाचे – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर, दि. 08 : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरणासोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य असायला हवे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध झाला असून सुधारित महिला धोरण कसे असावे, यासंदर्भात नागरिकांनी आपले अभिप्राय कळविणे आवश्यक आहे. यासंदर्भात चर्चा करूनच धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सुधारित महिला धोरणाच्या अनुषंगाने विभागीय स्तरावरील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ वर विकासकामांची माहिती

 नागपूर, दि. 8 :  राज्य शासनाने दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि  योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे.  कोल्हापूर–गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वरही आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे. या गाडीचे आज दुपारी नागपूर  रेल्वेस्थानकावर आगमन झाले. ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार

नागपूर, दि. 7: अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोरांना. त्यामुळे शासनाच्या पशुधन विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेईल यासाठी प्रयत्न करावा. गुरे, शेळी- मेंढीपासून कोंबड्यांपर्यत सर्वांचाच विमा काढता येतो. सहज सुलभ असणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात माहिती झाली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दी मोहीम राबवावी, असे निर्देश आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या मुंबई विदर्भ

राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

मुंबई, दिनांक 7 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह आयोगाचे इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई दि. ६ : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लतादीदींच्या निधनामुळे संगीताचा आवाज लोपला- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई, दि. ६ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. “मेरी आवाज ही […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

-शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना- स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला मुंबई, दि.६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई, दि.5 : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती भिवंडी, मालेगाव, धुळे, सोलापूर, इचलकरंजी आदी यंत्रमागबहुल भागांची प्रत्यक्ष पाहणी करून महिनाभरात शासनास अहवाल सादर करेल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली. वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे झालेल्या […]