आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले आहे . आता CMMRF या अॅप्लिकेशनवर अर्ज भरुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात याद्वारे 178 रुग्णांना 76 लाखांची मदत देण्यात आली.
*पहा काय म्हणाले मंगेश चिवटे*
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया,
तसेच सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.