विद्यार्थी मित्रांनो या लेखात आपण जाणून घेणार आहोत फार्मसी विषयी संपूर्ण माहिती तसेच फार्मसीला ऍडमिशन कशा पद्धतीने घेतले जाते ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच इतर कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते अशीच संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये मिळेल. Pharmacy ज्याला आपण बी फार्मसी असं म्हणतो. बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी हा एक पदवीधर कोर्स आहे.
एखाद्या औषधाचा वापर होण्यापूर्वी संशोधन व चाचणी पडताळणी करणे फार्मसीचे काम असते. त्यामुळे फार्मसीस खूप मोठी भूमिका निभावतो. फार्मसी हे क्षेत्र वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले आहे जसे की हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी इंडस्ट्रियल फार्मसी इतर. मेडिकल आणि हेल्थकेअर इंडस्ट्री मध्ये करिअर घडवण्यासाठी बॅचलर ऑफ फार्मसी एक चांगली पदवी आहे. फार्मसी उद्योग हा फक्त औषध विकसित करत नाही तर त्याची गुणवत्ता तपासणी चाचणी सुद्धा केली जाते.
फार्मसी म्हणजे काय ? | What is Pharmacy
फार्मसी हा एक पदवीधर कोर्स आहे ज्याच्या औषध उद्योगाच्या गुंतागुंत हाताळल्या जातात औषध आणि औषधे तयार करण्यापासून तर त्यांची तपासणी गुणवत्ता विविध वैद्यकीय वितरक स्टोअर आणि स्टॉकिंग पर्यंत काम करणारा एक फार्मासिस्ट असतो.
फार्मसी ऍडमिशन संपूर्ण माहिती | B Pharmacy Admission Process in Marathi
B Pharmacy हा एक पदवीधर कोर्स आहे. हा कोर्स चार वर्षाचा असून बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थी करू शकता किंवा फार्मसीचाच एक पर्यायी डिप्लोमा कोर्स आहे D Pharmacy हा केल्यानंतर सुद्धा फार्मसीला ऍडमिशन घेऊ शकतो त्यालाच आपण B Pharmacy असे म्हणतात.
डी फार्मसी झाल्यानंतर बी फार्मसी ला दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळते आणि बारावी सायन्स नंतर ऍडमिशन घेतल्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन मिळते. B Pharmacy Admission घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच तुम्ही बी फार्मसी ला ऍडमिशन घेऊ शकता
फार्मसी ऍडमिशन साठी लागणारी पात्रता | Eligible Criteria For B Pharmacy Admission
- B Pharmacy Admission साठी तुम्ही 12 वी Science किंवा Diploma in Pharmacy पूर्ण झालेला पाहिजे.
- तुमचा Diploma झाला असल्यास फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.
- 12 वी Science झाले असल्यास फार्मसीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश भेटतो.
- 12 वी सायन्स मध्ये तुमचे Phyaics, Chemistry आणि Biology हे तीन विषय 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे.
- तुम्ही कोणतीही एक फार्मसी प्रवेश परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. (उदा : NIPER JEE / MHT-CET)
12 वी नंतर फार्मसी ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया | After 12th Pharmacy Admission Process in Marathi
12 वी झाल्यानंतर फार्मसी ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तुमची रँक कळते. त्यानंतर Pharmacy Admission Councelling CAP Round साठी अर्ज करावा लागतो. कॅप राऊंड चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणती कॉलेज पाहिजे त्याचा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर कॅपचे 3 राऊंड होतात. या कॅप राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज वाटणी केली जाते. कॅप राऊंड मध्ये कॉलेजची निवड झाल्यानंतर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जावे लागते.
ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Pharmacy Admission Required Document List in Marathi
- 10 वी व 12 वी मार्कशीट
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (L.C किंवा TC)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) ( जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर टोकन पावती असणे आवश्यक असेल सहा महिन्याचा आत त्याला सादर करावे लागते)
- अधिवास प्रमाणपत्र ( Domacile Certificate)
- उन्नत व प्रगत गट मध्ये मोडण्याचे प्रमाणपत्र (Non Creamy layer) (Open /General, SC, ST कॅटेगिरी साठी आवश्यकता नाही)
- दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) अपंग असल्यास लागेल फक्त
- EWS सर्टिफिकेट असल्यास
- MHT-CET निकाल/ NEET निकाल / JEE Main निकाल.
- B Pharmacy बद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती.
B Pharmacy बद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती.
- B Pharm : बॅचलर ऑफ फार्मसी
- वेळ कालावधी : 4 वर्ष
- पात्रता : 12 वी (science) किंवा D.Pharm
- प्रवेश परीक्षा : MHT-CET/NIPER JEE/ KCET
भारतातील 10 मोठी इंजीनियरिंग महाविद्यालय
- रासायनिक तंत्रज्ञान संस्था आयटी ,मुंबई
- शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ,मुंबई
- पुना कॉलेज ऑफ फार्मसी ,पुणे
- बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ,मुंबई
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर
- भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी ,मुंबई
- जी एच रायसोनी विद्यापीठ ,अमरावती
- वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी ,औरंगाबाद
- आरसी पटेल फार्मासिटिकल एज्युकेशन ,शिरपूर
B Pharmacy च्या 4 वर्षांचे स्वरूप
बी फार्मसी हा कोर्स चार वर्षाचा असून याच्यात सुद्धा सहा महिन्याचे एक सेमिस्टर असते आणि एकूण चार वर्षात आठ सेमिस्टर असतात. बी फार्मसी च्या चारही वर्षात वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम मुलांना शिकवला जातो याच्यात थेरी क्लासेस प्रॅक्टिकल क्लासेस तसेच हेल्थकेअर इंडस्ट्री विजिटिंग प्रोजेक्ट अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा समावेश असतो.