माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवनगर येथील दिलीप बिश्वास यांच्या कुटुंबाला दिला आधार!
दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..!
मूलचेरा तालुक्यातील स्थानिक विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील रहवासी असलेले दिलीप बिश्वास हे काही दिवसापासून आजाराने ग्रस्त होते आणि ते मूलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते पण त्यांच्या प्रकृती मध्ये काही सुधार होत नव्हता म्हणून त्यांना चंद्रपूर येथील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं होत.पण आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने कुटुंबा समोर आर्थिक प्रश्न ? निर्माण झाला आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत होत, पण ही बाब मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मूलचेरा तालुका दौऱ्यावर असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे जाऊन दिलीप बिश्वास यांच्या कुटूंबाची भेट घेतली,आस्थेने त्यांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यांना आधार दिला व त्यांच्या कुटुंबाला 10000 (दहा हजार) रुपयांची आर्थिक मदत केली.
दिलीप बिश्वास यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील जनतेला रोगाने ग्रासलेल्या,अडी-अडचणीत, संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजु लोकांना आर्थिक मदत केली आहे.!
त्यावेळी विवेकानंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच तपन मल्लिक,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,जिल्हा सचिव बादल शाह,युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम,किशोर मल्लिक, गणेश गारघाटे,अक्षय चुधरी,पवन आत्राम हे उपस्थित होते.!