गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विकासकामांची आजही जोरदार चर्चा!

 

 

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक विकासकामे झाली असून आजही त्या कामांची जोरदार चर्चा सुरू आहे.

२०१४ मध्ये पहिल्यांदाच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आदिवासी विकास व वन खाते सोबतच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले.त्यांनी मिळालेला संधीचा सोन केलं असून आजही अहेरी विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यात त्यानी खेचून आणलेली निधीतून विकासकामे सुरू आहेत.अहेरी-रेगुंठा मार्गावरील गडअहेरी येथील पुलिया,अहेरी येथील एकलव्य शाळा,आलापल्ली येथील बसस्थानक या व्यतिरिक्त त्यांनी अनेक विकासकामे केली.याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अहेरी येथील सुरू असलेल्या ५८ कोटी रुपयांचा महिला व बाल रुग्णालय. अहेरी येथे रुग्णालय बांधकाम करणासाठी जागा उपलब्ध नव्हती मात्र,स्वतःकडे वन खाते असल्याने त्यांनी या आदिवासी बहुल भागातील महिला व बालकांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावा या उदात्त हेतूने त्यांनी जागाही मिळवून दिली.

एवढेच नव्हे तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल ३५० कोटी रुपयांचे रस्ते व पुलाचे बांधकाम केले.त्यामुळे अतिदुर्गम भागातील अनेक गावे शहरासाठी जोडण्यास मदत झाली.केवळ अहेरीचा विचार न करता विशेष म्हणजे आलापल्ली आणि नागेपल्ली या मुख्य शहरात वास्तव्याने राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे शुद्धपाणी मिळावे या उदात्त हेतूने जीवन प्राधिकरणाच्या १० कोटी रुपयांच्या संयुक्त पाणी पुरवठा योजना आणली.तर खेड्यापाड्यातील प्रत्येक गावात वीज पुरवठा व्हावी,विजेचा लपंडाव थांबावा यासाठी आलापल्ली येथे १३२ केव्ही,आष्टी ते आलापल्ली ४० किलोमीटर टॉवर लाईन,लगाम येथे ३३ केव्ही,असरल्ली,जारावंडी, आणि पेरिमिली येथील ३३ केव्ही सबस्टेशन साठी त्यांनी विशेष प्रयन्त केले.त्यातील बरेच कामे पूर्णत्वास आले.आणि काही कामे आज प्रगतीपथावर आहेत.या व्यतिरिक्त कोट्यावधी रुपयांची निधी त्यांनी खेचून आणली होती.

त्यांच्या कार्यकाळात अनेक रस्त्यांचे बांधकाम झाले.त्यात डांबरीकरणाचे काम महत्वाचे होते.मात्र,आज त्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना रस्त्यावरील खड्यातून प्रवास करावा लागत आहे.सध्या अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.केवळ डागडुजी काम करून थातूरमातूर काम केले जात आहे.मात्र,डांबरीकरणाचे नवीन काम होत नसल्याचे स्थानिकांमधून रोष व्यक्त केले जात आहे.त्यामुळे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ बरं होता अस सूर अहेरी विधानसभा क्षेत्रात निघतांना दिसत आहे.सध्या राजे अम्ब्रिशराव आत्राम कुठलेही पदावर नसले तरी त्यांनी केलेल्या कामांची प्रशंसा होतांना दिसत आहे हे विशेष..!!