भाजपचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोशाने कामाला लागा- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यसमितीची बैठक संपन्न.
गडचिरोली : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यादा देशाच्या पंतप्रधान पदी बसविण्यासाठी भाजपा कार्यकर्ते यांनी ताकदीने काम करणे गरजेचे आहे,कुठलेही मत भेद बाजूला सारून भाजपचे सरकार आणण्यासाठी जोशाने कामाला लागा असे आव्हान माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यसमितीची बैठक गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात आयोजित केली होती.या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना
नियुक्ती प्रमाणपत्र आणि नेमप्लेटचे वितरण करण्यात आले.
या बैठकीला प्रामुख्याने मंचावर विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे,ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सा.पोरेड्डीवार,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,पक्षाचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस,पक्षाचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, सदानंद कुथे,गोविंद सारडा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे,ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,किसान आघाडीचे रमेश बारसागडे,बंगाली समाजाचे नेते दीपक हलदार तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.!
