महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता वय वर्षे १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत २१ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना – Health Scheme for Registered bandhkam kamgar:
- नोंदित लाभार्थी स्त्री व पुरुष बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५ हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २० हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
- लाभार्थी कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य.
- नोंदित लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती किंवा पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत बंद ठेव.
- नोंदित लाभार्थी कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य. तथापि, नोंदीत बांधकाम कामागाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ अनुज्ञेय.
- व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरीता ६००० रुपये अर्थसहाय्य.
ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- छायाचित्र ओळख पुराव्यासाठी आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक.
- रहिवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे वीज देयक, ग्रामपंचायत दाखला यापैकी एक.
- वयाबाबतचा पुरावा आधारकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक. (पूर्ण जन्मतारीख नमुद असणे आवश्यक).
- स्वयंघोषणापत्र.
- आधार संमतीपत्र.
- मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याबाबत नियोक्त्याचे, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगरपालिकाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
- बँक पासबुकची छायांकित प्रत.
संपर्क: बांधकाम कामगारांनी अधिक माहितीसाठी नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा आणि योजनेच्या लाभाचा अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा. तसेच अपर जिल्हा कामगार आयुक्त, येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : (022) 2657-2631 ई-मेल : [email protected]