ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ..

राज्यातील 10वी आणि 12वीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आणखी वाढवली आहे.

सध्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 5 नोव्हेंबर आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज सरल डेटाबेसवरून भरण्याची मुदत 10 नोव्हेंबरला संपणार असून या मुदतीत वाढ केल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

अर्ज भरण्यासाठी मुदत..

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहीतीनुसार आता 12वीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

 दरम्यान 10वी बोर्ड आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच जारी करण्यात आलं असून त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर येत्या काही दिवसांत बोर्डाकडून परीक्षांचे निश्चित वेळापत्रक जाहीर होईल.