मुलचेरा येथील स्व. श्री. मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उदघाटन श्री. मनोजभाऊ बंडवार उपसरपंच ग्रा. पं. कोठारी यांच्या हस्ते दिनांक 27/02/2023 रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. एल. ढेंगळे उपस्थित होते. प्राचार्य ढेंगळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रगतीताई बंडावार माजी उपसभापती पं. स. मुलचेरा, श्री. रवींद्रजी झाडें माजी उपसरपंच ग्रा. पं. कोठारी, श्री. याकूबजी बानोत, श्री. पत्रुजी कोडापे, श्री. बंडुजी आलाम नगरसेवक मुलचेरा, प्रा. नितेश बोरकर, प्रा. दीपक सहारे, श्री. नितेश झाडें, श्री रुपेश वाग्दरकर, श्री. कमलेश निमगडे, श्री. आदित्य चिप्पावार, श्री. राकेश नासानी, श्री. भाऊजी रापंजी, कु. विद्या देठे तसेच रासेयो स्वयंसेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमरदीप रामटेके तर आभारप्रदर्शन प्रा. राष्ट्रपाल गायकवाड यांनी केले.
Related Articles
रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग
मुंबई, दि. ४ – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांना चालना […]
भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती
Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Railway Recruitment Board (RRB) is in charge of managing the Group D Recruitment process, which is used to fill a variety of roles within the Indian Railways. Candidates that are interested in obtaining a government career that offers big […]
लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे. सुसज्ज दिव्यांग अद्यावत कार्यशाळा, यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यातील दिव्यांगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात […]