ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राम मंदिराला इस्रायल पुरवणार सुरक्षा कवच

अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल अँटी ड्रोन सिस्टिमचे सुरक्षा कवच पुरवणार आहे. या सुरक्षा सिस्टिममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सुरक्षा यंत्रणा बसविण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या यंत्रणेच्या खरेदी प्रक्रिया पूर्ण केली.
उत्तरप्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अँटी ड्रोन सिस्टिम अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात केली जाणार आहे. अनेक टप्प्यातील परीक्षणानंतर हा निर्णय घेण्यात आला. security cover to Ram Temple 22 जानेवारी रोजी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, तेव्हा या अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात आला होता. यापूर्वी दिल्लीत झालेल्या जी-20 परिषदेया सुरक्षेसाठी या यंत्रणेचा वापर करण्यात आला होता.
 
काय आहेत वैशिष्ट्ये
अँटी ड्रोन सिस्टिम ही मानवरहित हवाई उपकरणांना रोखण्यासाठी तयार उपयोगात आणली जाते. विशेष रेडियो फि‘क्वेन्सीच्या माध्यमातून ते शत्रूच्या ड्रोनची ओळख पटवते. त्यानंतर संशयास्पद हालचालींचा टिपत सुरक्षा रक्षकांपर्यंत ती पोहोचते आणि अचूक वेध घेऊन नष्ट करते. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत शत्रूच्या ड्रोनचा पत्ता लावू शकते तसेच ते शोधून निष्कि‘य करू शकते. उत्तरप्रदेश सरकारने अशा प्रकारच्या दहा सुरक्षा यंत्रणा खऱेदी केल्या आहेत.