रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे, मुंबई (Central railway recruitment-2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या भरतीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :
एकूण जागा – 596
पुढील पदांसाठी भरती
- कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Junior Commercial Clerk and Ticket Clerk)
- वरिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक (Senior Commercial Clerk and Ticket Clerk)
- लघुलेखक इंग्रजी (Stenographer English)
- गुड्स गार्ड (Goods Guard)
- स्टेशन मास्टर (Station Master)
- कनिष्ठ लेखा सहाय्यक (Junior Accounts Assistant)
- लेखा लिपिक (Accounts Clerk)
शैक्षणिक पात्रता व अनुभव
कनिष्ठ व्यावसायिक लिपिक आणि तिकीट लिपिक – बारावी पास व shorthand speed of 80 wpm पर्यंत शिक्षण, किमान अनुभव.
इतर सर्व पदांसाठी – ग्रॅज्युएशन, तसेच किमान अनुभव आवश्यक
निवड प्रक्रिया
- संगणक आधारित चाचणी
- योग्यता/वेग/कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी आणि
- वैद्यकीय तपासणी
आवश्यक कागदपत्रे
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://rrccr.com/gdce_multiple/Login/index