आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षा घेता वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी –
केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी ‘एकात्मिक ऊर्जा विकास योजना’ सुरू केली आहे. महाराष्ट्रात हि योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे
शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे.
वीज वितरण प्रणालीतील वीज हानीचे योग्य मोजमाप करण्यासाठी रोहित्र फिडर यावर योग्य क्षमतेचे मीटर लावणे.
शहरी भागातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसाठी वीज जोडण्या देण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे.
शहरी भागातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण किंवा आधुनिकीकरण करणे.