मूलचेरा:- तालुक्यातील देशबंधूग्राम येतील क्रीष्णा मदन सरकार हे गेल्या काही महिन्यापासुन कॅन्सरग्रस्त आहेत, आर्थिक परिस्थितिमुळे त्यांना ह्यावर उपचार घेणेही कठीण होत होते, त्यांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मदत मागीतली आणि राजे साहेबांनी एका शब्दांत त्यांची आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत केली
समोरच्या उपचारासाठी नागपूर येथील राष्ट्रीय कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येते जा मी डॉक्टरांशी बोलून तुमची पूर्ण व्यवस्था करतो अशी हमी ह्यावेळी राजे साहेबांनी दिली, ह्यावर क्रीष्णा मदन सरकार यांनी मदत केल्याबद्दल राजेंचे आभार मानले, ह्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गणपती, मूलचेरा येतील नगरसेवक दिलीप आत्राम सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
