ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकरथ हेडलाईनस, 5 नोव्हेंबर 2022

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार

शालेय पोषण आहाराचे नाव बदलले; केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण केले ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’,
देशातील 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना होतो लाभ

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने कर्णधारपदाचा दिला राजीनामा, ट्विटरवर एका पोस्टद्वारे संघाचे कर्णधारपद सोडण्याची केली घोषणा

मुख्यमंत्री शिंदेंनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट, तब्येतीची विचारपूस करून प्रकृती उत्तम असल्याची दिली प्रतिक्रिया

आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री तथा टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या ताफ्यावर दगडफेक, नंदीग्राम येथे सुरु असलेल्या रोड शो दरम्यान त्यांचे सीएसओ जखमी

इलॉन मस्कने कर्मचारी कपात करणे केले सुरु, ट्वीटरमधील अनेक भारतातीय कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता, अचानक ईमेल पाठवत दिले नारळ

व्हॉट्सअ‍ॅपने नवे भन्नाट फिचर जाहीर: एका ग्रुपमध्ये तब्बल 1024 सदस्य जोडता येणार, 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार

नोव्हेंबरमध्ये 3 कंपन्यांचा IPO येणार; फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल्स आणि केन्स टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश

औरंगाबादकरांच्या सेवेत 6 महिन्यांत 35 एसी इलेक्ट्रिक बसेस येणार, पुढील 30 दिवसांच्या आत इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार केला जाणार

चित्रपटगृहांत सध्या अनेक सिनेमे रिलीज: फोन भूत, मिली, डबल XL, मन कस्तुरी रे, प्रेम प्रथा धुमशान, 36 गुण या सिनेमांची रसिकांना भेट