ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकरथ  हेडलाईन्स, 4 नोव्हेंबर 2022

भारतात 2020-2021 मध्ये कोरोना काळात 20 हजार शाळांना लागली कुलपं, शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जाहीर केलेल्या अहवालात माहिती

प्रधानमंत्री मोदी यांच्या सूचनेनंतर रोजगार मेळाव्याला प्रतिसाद देणारे महाराष्ट्र पहिले राज्य; नगरविकास विभागासाठी केंद्र सरकारकडून मिळाले 14 हजार कोटी रुपये – मुख्यमंत्री

भारतात आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, iOS 16 मधील बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा, औरंगाबादचे माधवराव साळुंके ठरले मानाचे वारकरी

पाकिस्तानी अभिनेत्री सेहरची थेट लग्नाची ऑफर, म्हणाली – भारताला पराभूत केल्यास मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन; 6 नोव्हेंबरला भारत vs झिम्बाब्वे सामना

दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या काही वाहनांच्या प्रवेशावर केंद्रीय वायु गुणवत्ता आयोगाने घातली बंदी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकना मात्र सूट

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात एकूण 928/1000 गुण मिळवून महाराष्ट्र देशात प्रथम, मंत्री केसरकर यांनी शिक्षण प्रणालीतील सर्व संबंधितांचे केले अभिनंदन

गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याची तयारी, मुंबईतील आमदार योगेश सागर-प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर या मराठी आमदारांवर भाजपने दिली जबाबदारी

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 256 मतदान केंद्रावर झाले 31.74 टक्के मतदान, निकाल 6 नोव्हेंबरला; निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची माहीती

फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का! फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी अचानक दिला राजीनामा, आता नवीन प्रमुख कोण होणार याकडे लक्ष