ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती

आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • जळीत
  • पॉलिट्रामा
  • प्रोस्थेसिस
  • जोखिमी देखभाल
  • जनरल मेडिसिन
  • संसर्गजन्य रोग
  • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • हृदयरोग
  • नेफ्रोलोजी
  • न्युरोलोजी
  • पल्मोनोलोजी
  • चर्मरोग चिकित्सा
  • रोमेटोलोजी
  • इंडोक्रायनोलोजी
  • मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
  • इंटरवेन्शनल रेडीओलोजी

विम्याचा हप्ता कोण देणार ?

या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत  करण्यात येतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत कोणती रुग्णालय समाविष्ट आहेत ?

या योजनेत शासकीय आणि निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची ३० पेक्षा अधिक खाटा असणारे असणाऱ्या निकषांवरून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रूग्णालयात त्यांचा उपचार करून घेऊ शकतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची फी किती ?

या योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास ही निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. ती पुर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधा पत्रक पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे. १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये सातबारा उतारा फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीभूत रुग्णालयांमधून उपचार हा अनुज्ञेय राहणार आहे. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार निदान आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एका वेळचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये सामावेश करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केलेल्या केल्यानंतर दहा दिवसांत पर्यंतचा सेवा पॅकेज मध्ये समाविष्ट आहेत.

आरोग्यमित्र –

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी उपचारादरम्यान सहाय्यक तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र हे उपलब्ध असणार आहेत.

आरोग्य शिबिर –

योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता यावा, यासाठी अंगीकृत रुग्णालयामार्फत ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून दिली जाते. तसेच या योजनेतील ९७१ उपचारांत पैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात.

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे असणार आहेत.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र

(MJPJA) महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची ऑफिशियल वेबसाइट –

https://www.jeevandayee.gov.in/

mjpjay registration online 2022 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

पोर्टलवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया –

  • सर्व प्रथम, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
  • मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पृष्ठ दिसेल, त्यामध्ये तुम्हाला युजर आईडी पासवर्ड भरावा लागेल.
  • त्यानंतर लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
  • अश्या प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन होईल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी –

  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
  • यामध्ये आपल्याला स्वतःशी संबंधित सर्व माहिती तयार करावी लागेल आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
  • यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • मित्रांनो सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत असाल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार मिळू शकतात.

 Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Contact Number –

रुग्णालय- आरोग्य मित्र (MJPJA contact)

पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. १६५६५, वरळी पोस्ट ऑफिस
वरळी मुंबई – ४००००१८