गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या राज्य विदर्भ

प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलिट जनजागृती अभियान

तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील गावा गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती तसेच पौष्टिक करून धान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्याकरता कार्यक्रम राबविण्यात येत असून यावेळी मोजा कोपरआली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना कृषी सहायक प्रदीप मुंडे* यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धत तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याच्या बियाण्याच्या मिनी किट वाटप करण्यात आल्या व त्यांना एक प्रकल्प राबविण्यात सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री मडावी सर तसेच समस्त शिक्षक वृंद व मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक विचारपूस करण्यात आले आई  फ्लू विषयी प्रतिबंधात्मक उपायाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आले व स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले