ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मुलचेरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडाचे उद्यापासून आयोजन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान

जिल्हाधिकारी साहेब संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान नागरिकांचे अर्ज/तक्रारी निकाली निघणार तहसिलदार कपिल हाटकर

मुलचेरा:-
तालुक्यात तहसिल कार्यालय येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कार्यक्रम संदर्भात जिल्हाधिकारी साहेब संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिदार कपिल हाटकर यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कर्मचारी यांची बैठक 16 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले.

या बैठकीत सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी अर्ज, तक्रारींच्या माध्यमातून पोर्टलवरती प्रत्यक्ष संवाद होवून कामे पूर्ण केली जातात. यामधे काही प्रकरणे प्रलंबित असल्याने योजनांची, सेवांची अंमलबजावणी होण्यास वेळ लागतो. यासाठी प्रशासनाकडून दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान मुलचेरा तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा शासनाच्या सूचनेनूसार राबविण्याचे नियोजन केले आहे. या कालावधीत प्रशासनाकडे दि. 10 सप्टेंबर पर्यंत दाखल सर्व अर्ज तसेच तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत करण्यात येणार आहे अशी माहिती तहसिलदार कपिल हाटकर यांनी दिली.
सेवा पंधरवाड्यामधे प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषि, आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा तसेच सर्व शासकीय विभागाकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येणार आहे.अशी माहिती बैठकीत देण्यात आले.


या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,संवर्ग विकास अधिकारी मनोहर रामटेके,श्री भांडेकर मंडळ अधिकारी,श्री.मेश्राम तलाठी विवेकानंदपूर, श्री चिदमवार तलाठी लगाम तसेच कर्मचारी उपस्थित होते