ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री पीक विमा पावती घरपोच देण्यात येणार – तालुका कृषि अधिकारी कार्यालय मुलचेरा

मुलचेरा :-  केंद्र शासना मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 योजनेतील शेतकऱ्यांना त्यांच्या विमाची पावती घरपोच देण्यात येणार आहे.उपक्रमाची सुरुवात तालुका कृषीअधिकारी कार्यालय मुलचेरा येथे शेतकऱ्यांना विम्याची पावती देण्यात आली.हा उपक्रम ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उदघाटन 15 सप्टेंबर रोजी तालुका कृषि अधिकारी श्री.विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी. श्री.   व्ही. एस. हारगुळे  कृषी पर्यवेक्षक , श्री.दीपक बलकर कृषिसहाय्यक,कनिष्क वाघमारे कृषिसहाय्यक, शिवपाल डोरे कृषी सहाय्यक. तिरुपती कौशल्ये, कृषिसहाय्यक ,निलेश मडावी लिपिक ,पवन होमने लिपिक ,परेश वासनिक लिपिक , विमा प्रतिनिधी राजेश गुंतीवार  यांनी उपस्थित होते.