विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. यापुढे National Council of Educational Research and Training –
अर्थात NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ या शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यात येणार, असा निर्णय NCERT ने घेतला आहे.
*पहा काय सांगितले NCERT ने*
NCERT च्या पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
त्यानुसार आता NCERT पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार.
तसेच प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द वापरण्यात येणार, असेही NCERT ने म्हटले आहे.