गडचिरोली: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार दि.15 ते 17 मार्च 2023 रोजी पंडीत दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेणेकरिता ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर गेल्यावर त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडुन आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक व पासवर्ड ने लॉगीन करून करावे.लॉगीन केल्यानंतर आपल्या प्रोफाईल होम पेजवरील पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर गडचिरोली हा पर्याय निवडावा. गडचिरोली जिल्हयाची निवड करून फिल्टर बटनावर क्लिक करा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर या ओळीतील ॲक्शन मेन्युतील दुस-या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करून आय ॲग्री हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना,कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय करावे. अशा प्रकारे रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पोलीस मुख्यालया समोर शासकीय संकुल बॅरेक क्र.2, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.
