मुलचेरा :- केंद्र शासना मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 योजनेतील शेतकऱ्यांना त्यांच्या विमाची पावती घरपोच देण्यात येणार आहे.उपक्रमाची सुरुवात तालुका कृषीअधिकारी कार्यालय मुलचेरा येथे शेतकऱ्यांना विम्याची पावती देण्यात आली.हा उपक्रम ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उदघाटन 15 सप्टेंबर रोजी तालुका कृषि अधिकारी श्री.विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी. श्री. व्ही. एस. हारगुळे कृषी पर्यवेक्षक , श्री.दीपक बलकर कृषिसहाय्यक,कनिष्क वाघमारे कृषिसहाय्यक, शिवपाल डोरे कृषी सहाय्यक. तिरुपती कौशल्ये, कृषिसहाय्यक ,निलेश मडावी लिपिक ,पवन होमने लिपिक ,परेश वासनिक लिपिक , विमा प्रतिनिधी राजेश गुंतीवार यांनी उपस्थित होते.
Related Articles
समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल […]
भारतीय जनता पक्ष हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे- राजे अम्ब्रीशराव आत्राम
सुंदरनगर येते भाजपा मूलचेरा तालुका कार्यकारणी बैठकीत कार्यकर्त्यांना राजेंनी केले मार्गदर्शन मूलचेरा:-तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकरणीची बैठक आज सुंदरनगर येथे संपन्न झाली, ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणांत बोलतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे तसेच प्रत्येक […]