मुलचेरा: सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र तरीदेखील अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच मुलचेरा तालुक्यात लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थी उपस्थिती संख्या रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरू झाल्याचे आढळून येत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम जाणवू लागला आहे.
● डोळ्यांची साथ येत असताना याची
लक्षणेदेखील समजून घेतली पाहिजे.
यात डोक्यात टोचणे, खुपल्यासारखे होणे, डोळ्यांचा रंग लाल, गुलाबी होणे, जळजळ होणे, खाज सुटणे
● सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहणे, अशी लक्षणे दिसून येतात.
नेत्र ड्रापचाही तुटवडा छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत डोळ्यांच्या आजाराची साथ वाढत असून उपचारासाठी रुग्णांची धावपळ दिसून येत आहे. काही रुग्ण रुग्णालयात जात आहेत. तर काही रुग्ण मेडिकल स्टोअर्समध्ये डोळ्यांच्या औषधीसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ पसरत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, ही बाब सामान्य आहे. डोळे थंड पाण्याने धुवावे, कुटुंबातील व्यक्तींनी रुमाल, टॉवेल स्वतंत्र वापरावा. सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करू नये. हात स्वच्छ धुत रहावे, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही. अशे सुचना डॉ. ललित मल्लिक तालुका वैधकिय अधिक्षक मुलचेरा यांनी नागरिकांना केले आहे.