गडचिरोली:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंअंतर्गत सन 2018 -19 ते 2021-22 या कालावधीतील महाडिबीटी पोर्टलवरील विविध तांत्रिक कारणांमुळे गडचिरोली जिल्हयातील 2247 विद्यार्थी व 1980 महाविद्यालयांची शिष्यवृत्ती प्रलंबीत आहे, त्या अनुषंगाने सर्व गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले स्तरावरुन तांत्रिक समस्या कळवुन त्यांना महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती संबंधित खात्याविषयी जर तांत्रिक समस्या असल्यास आपण स्वत: प्राचार्य नात्याने लवकरात लवकर समस्येचे निराकरण करावे व तसा अहवाल सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयास त्वरीत सादर करावा. वरील सुचनेनुसार कोणताही इतर मागासवर्गिय पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास व संबंधित महाविद्यालयाने तांत्रिक समस्या न सोडवल्यास व त्या अनुषंगाने महाविद्यालय अथवा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास प्राचार्य या नात्याने आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल यांची गांभिर्याने नोंद घेण्यात यावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Related Articles
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- व द्वितीय 11000/-रुपये पारितोषिक..!! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव येथील राकेश मडावी यांना उपचाराकरिता केली अर्थिक मदत.!
अहेरी जवळील महागाव बुजचे रहिवासी राकेश अनिल मडावी वय 28 असुन यांची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळें त्याच्या कुटुंबीयांकडे उपचाराकरिता पुरेसे पैसे नसल्याची माहिती उप सरपंच संजय अलोने यांनी ही गोष्ट माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळवताच राजेंनी पुढील उचाराकरीता त्यांच्या कुटुबीयांना कडे १०,००० रुपयांची (दहा हजार) अर्थिक मदत केली आहे. आठवड्यात पूर्वी महागाव बुजुर्ग […]
EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण मतदान प्रक्रियेकरीता प्रशासन सज्ज
देसाईगंज :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी EVMs-VVPATs चे द्वितीय सरमिसळ (Second Randomization) व EVMs/VVPATs मशिन तयार करण्याचे काम पुर्ण करणे आवश्यक असल्याने , मा. निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार (भा.प्र.से.) व मा. […]