माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील मेडीगड्डा डॅम ते तेलंगणा या मार्गाची दुरुस्ती..!
रस्त्याची रहदारी सुरळीत झाल्याने असरअली,अंकिसा,वडदम,सोमनुर येथील गावकऱ्यांनी माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे मानले आभार..!!
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तेलंगणा राज्य सीमा लगत असलेला सिरोंच्या तालुक्यातील असरअली, अंकिसा,वडदम,सोमनुर अशा अनेक गावातुन रोजंदारीसाठी हजारो मजूर मेडीगड्डा डॅम वरून रोज मजुरीसाठी वाहनांनी तेलंगणा राज्यात शेतीच्या कामाला दररोज रहदारी करत असतात.पण या वर्षी पावसामुळे मेडीगड्डा डॅम ते तेलंगणा जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला होता आणि या खड्ड्यांमुळे रोजगारसाठी जाणा-या मजदुरांना वाहनाने रहदारी करण्यासाठी खुप शारीरिक त्रास सहन करावा लागत होता आणि जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत होती.
पण ही गावकऱ्यांची समस्या सिरोंच्या येथील भाजप कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली. राजें साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता कार्यकर्ते यांच्या हस्ते आर्थिक मदत पाठवून,गावकऱ्यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्ती करण्यात आली,त्यामुळे मेडीगड्डा डॅम ते तेलंगणा हा मार्ग सुरळीत सुरू झाला.यामुळे असरअली,अंकिसा,वडदम,सोमनुर येथील गावकऱ्यांनी व वाहन धारकांनी पोस्टर लावून माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे आभार मानले.
माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कार्यकर्ते श्री.शंकर नरहरी,सीतापती गट्टू,श्रीकांत सुगरवार,श्रीनाथ राऊत,मुरलीधर रच्चावार,समय्या सिंगनेनी,महेश कोत्तापल्ली,बट्टी मल्लेश, हरीश कोत्तावडला,अल्लम सत्यम,अशोक गंटा,असरअली,अंकिसा,वडदम,सोमनुर येथील गावकरी उपस्थित होते..!