आस्थेने संवाद साधून केली विचारपूस
अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी तात्काळ छल्लेवाडा गाठून आस्थेने विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली.
10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास यशोदा बाई अजमेरा यांच्या घराला आग लागल्याने क्षणात त्यांचा होतंचं नव्हतं झाला.काही कळण्यागोदरच घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यांचा लाखोंचा नुकसान झाला. याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर यांना आपल्या कार्यकर्त्यांनी कळविले.आज ते छल्लेवाडा गाठून प्रत्यक्ष भेट देत अजमेरा यांच्याशी आस्थेने संवाद साधून आर्थिक मदत केली.तसेच भविष्यात कुठलीही मदत लागल्यास प्रत्यक्ष भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करा.मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, अरुण मुक्कावार,मखमुर शेख,रामप्रसाद मुंजमकर,बापू पुताला आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
थेट तहसीलदारांसोबत साधले संवाद
छल्लेवाडा येथील घटनेची माहिती ऋतुराज हलगेकर यांनी अहेरीचे तहसीलदार यांना दिली व पंचनामा करून नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी केली. याशिवाय कुठल्या योजनेतून त्यांना मदत करता येईल याबाबत चर्चा केली.यावर तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अजमेरा कुटुंबीयांनी आभार मानले.
