मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठये, श्रीमती मेघना तळेकर, राजेश तारवी, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
