आज दिनांक 15/09/2023 रोजी उप पोलिस स्टेशन पातागुडम येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख सो. यांच्या संकल्पनेतून तसेच मा.श्री सुहास शिंदे सो.उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दल दादालोरा खिडकी अंतर्गत ”एक गांव एक वाचनालय” उपक्रमा अंतर्गत मौजा पातागूडम येथे *”वीर बाबुराव शेडमाके” सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा* व भव्य जन आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर जन आरोग्य मेळावा तसेच सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळयाचे अध्यक्ष म्हणून मौजा पातागुडम गावच्या सरपंच श्रीमती सुजाताताई येलम तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री. सुहास शिंदे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा, तसेच श्री. राठोड सा. पोलीस निरीक्षक सिरोंचा,
डॉ. चंद्रशेखर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भोपालपटनम छत्तीसगड, तसेच हद्दीतील 150 ते 200 नागरीक हजर होते.
सदर कार्यक्रम अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. सुहास शिंदे सा. व. राठोड सा. यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. श्री. चंद्रशेखर यांनी उपस्थित गरजुंची वैद्यकीय तपासणी करुन नागरिकांना आरोग्या बाबत मार्गदर्शन केले,
यावेळी प्रभारी अधिकारी तळेकर साहेब पोलीस उपनिरीक्षक तुतूरवाड साहेब पो उपनिरीक्षक कोठावळे साहेब यांची उपस्थिती होती व त्यानंतर मा.श्री. सुहास शिंदे सा. व पोलीस निरीक्षक श्री. राठोड सा. यांच्या उपस्थितीत उप पोलीस स्टेशन पातागुडम ते वीर बाबूराव शेडमाके सार्वजानिक वाचनालयापर्यंत ग्रंथ दिंडी काढून श्रीमती सुजाताताई येलम यांच्या हस्ते फित कापून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले,
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोशि. महादेव घुले यांनी केले व पोउपनी/ ऋषिकेश तळेकर प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन पातागुडम यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले..
यावेळी सदर कार्यक्रमास प्रभारि अधिकारी पो उपनिरीक्षक तळेकर साहेब पोलीस उपनिरीक्षक तुतूरवाड साहेब पो उपनिरीक्षक कोठावळे साहेब तसेच जिल्हा पोलीस अंमलदार आणि srpf कर्मचारी यांची उपस्थिती होती जेवणाची व्यवस्था करण्यात येवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
सदर लोकार्पण सोहळ्यासाठी जि.पो. तसेच SRPF मुंबई यांचे अधिकारी व अंमलदारांचे मोलाचे सहकार्य लाभले.