ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वृषाली ऊईके चे यश प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. मेश्राम

मुलचेरा:-
कलेला परिस्थितीचे अडथळे रोखू शकत नाही. तिची साधना केली तर ती व्यक्तीला भरभरून देते. हे वृषाली ऊईके हिने सिद्ध केले, असे प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम यांनी गौरवोद् गार काढले. ते वृशाषालीच्या छोटेखानी सत्काराप्रसंगी बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा सारख्या मागास व दुर्गम तालुक्यात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन वृषालीने चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेत पदवी संपादन केली. वृशाली हीने काढलेल्या चित्रांची भारतातील मुंबईस्थित प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॕलरीमध्ये निवड झाली होती. एका चित्रकला चाहत्याने वृषालीच्या एका चित्राची ३५ हजार रुपये एवढी किंमत देऊन खरेदी केली.

या तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठी राजे धर्मराव महाविद्यालय, मुलचेरा येथे छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. वृषाली ही राजे धर्मराव महाविद्यालयातील कर्मचारी कविता ऊईके यांची कन्या आहे. प्राचार्य डॉ. मेश्राम तथा डॉ. हिराचंद वेस्कडे, डॉ. अजय मुरकूटे, डॉ. हेमंत गजाडीवार, डॉ. अरुण लाडे, प्रा, प्रवीण कुमरे, सुरेश मुरमुरवार, मारोती खिरटकर यांनी वृषालीच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.