Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्राझीलच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

ब्राझील महाराष्ट्राशी कृषी सहकार्य

ब्राझीलच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 27 : ब्राझीलने भारताचे महत्त्व ओळखले असून आपला देश भारताशी विशेषतः महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी येथे केले.    

राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी बुधवारी (दि. २७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

भारताशी आर्थिक तसेच व्यापार विषयक सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने पुढील वर्षी ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष तसेच तीन प्रांतांचे गव्हर्नर भारत भेटीवर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्राझील भारताशी कीटकनाशकेबी-बियाणेजैविक खते या विषयांमध्ये सहकार्य वाढविणार असून ब्राझील हा पारंपरिक डाळी उत्पादन करणारा देश नसल्यामुळे या क्षेत्रात भारताकडून सहकार्य प्राप्त करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राझील मधील गायी बऱ्याच अंशी भारतीय गोवंशाच्या आहेत व तेथील हवामान त्यांना अनुकूल झाले असल्याचे राजदूतांनी सांगितले.

भारत व ब्राझील जगाचे अन्नदाते: राज्यपाल

ब्राझील कृषी महाशक्ती असून भारत आणि ब्राझील मिळून संपूर्ण जगासाठी अन्नधान्य निर्मिती करू शकतात असे राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात ४ कृषी विद्यापीठे तसेच १ पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ असून ब्राझील मधील कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावेअशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. या सहकार्याअंतर्गत विद्यार्थी – व शिक्षण आदान – प्रदान तसेच परस्परांच्या देशात विद्यार्थ्यांना एक एक सत्र करण्याची मुभा देता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.   

फुटबॉलमध्ये देखील राज्याला सहकार्य करावे

ब्राझील म्हटले की बहुतांशी भारतीयांना ब्राझीलच्या महान फुटबॉल खेळाडूंची आठवण होते. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात फुटबॉलची लोकप्रियता वाढत असून या क्षेत्रात देखील ब्राझीलने सहकार्य करावेअशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला ब्राझीलचे भारतातील व्यापार प्रतिनिधी वॅग्नार सिल्व्हा इ एंट्यून्स तसेच कृषी सल्लागार अँजेलो डे केईरोस मॉरिसिओ उपस्थित होते.

००००