ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‌www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.