गडचिरोली: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 14 जूलै,2022 च्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) तयार करावयाचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दिनांक 01 नोव्हेंबर,2022 या आर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या ( de-novo) पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत, आपले नाव शिक्षक मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यायासाठी दिनांक 01 ऑक्टोंबर, 2022 पासुन अर्ज स्विकारणे सुरु होणार आहे. आपले नाव शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी आपल्या मुळ रहिवासच्या तालुक्यातील तहसिल कार्यालय मधुन नमुना क्रमांक-19 अर्ज प्राप्त करुन संबंधीत अर्ज नमुना क्रमांक -19 वर दिलेली माहिती भरुन संबंधीत उपविभागीय अधिकारी/तहसिल कार्यालय मध्ये सादर करावे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली, समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.
Related Articles
मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ […]
मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी
गडचिरोली,दि.17 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. मतदारसंघात 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार […]
महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 3 : चौथे महिला धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. महिला व बालविकास मंत्री श्री.लोढा म्हणाले, सर्व विभागांना या महिला धोरण मसुद्याची प्रत पाठवून प्रत्येक विभागामार्फत सूचना मागवाव्यात. हे महिला […]