ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे जागतिक बालिका दिन उत्साहात साजरा

जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तिकीकरण करणे काळाची गरज.
–  दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा
मुलचेरा- जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दिपाली कांबळे पी.एस.आय. मुलचेरा  यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय येथील रा. से . यो. विभाग तथा स्पर्श एनजीओ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या जागतिक बालिका दिन कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. भारतातील सर्वोच्च पद असलेले महामयीन राष्ट्रपती द्रोपदी मुरूम यांचे उदाहरण त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर प्रकाश टाकला. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. हरी शिव प्रसाद, तर प्रमुख अतिथी म्हणून  दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा , श्री. संदीप साखरे सर पी.एस.आय. मुलचेरा, तसेच मंगल मंडल प्रोजेक्ट ऑफिसर, स्पर्श एनजीओ गडचिरोली हे उपस्थित होते. 
जागतिक बालिका दिन का साजरा केला जातो ? तसेच त्याची कधीपासून सुरुवात झाली ? या वर्षीच्या जागतिक बालिका दिनाचा विषयी काय या संपूर्ण विषयासंदर्भात विस्तृत असे माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.  हरि सीव प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना दिली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल मंडल यांनी केले तर सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधकारी प्रा. गौतम वाणी यांनी केले, शेवट आभारप्रदर्शन डॉ. श्रीराम महाकाळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.