मुलचेरा :
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ करिता ई-पीक पाहणी सुरू कार्यक्रमांतर्गत ई-पीक नोंदणी करावे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्हर्जन -२ हे ॲप तयार करून त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने आणि महसूल विभागाने केले आहे.शासनाला कृषी क्षेत्राची संपूर्ण माहिती वास्तवपणे उपलब्ध व्हावी याकरिता तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना सुविधा पुरविण्याच्या हेतूने ई-पीक पाहणी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ई-पीक पाहणीद्वारे किती हेक्टरवर कोणत्या पिकाचे नियोजन आहे. ते कोरडवाहू आहे की सिंचित आहे. शेतावर झाडे, गोदाम, पोल्ट्री फार्म आहेत काय? शेतकरी शासनाच्या योजनेकरिता सकारात्मक आहे काय? अशा विविध हेतूने शासनाने ई-पीक पाहणी कार्यक्रमाची नियोजन केलेले आहे. कर्ज, आधारभूत केंद्रावर धान विक्री व अन्य काही कामाकरिता ई पीक पाहणी नियोजन अत्यंत फायदेशीर ठरलेले आहे. सरकारला एका क्लिकवर संपूर्ण शेतीची माहिती उपलब्ध होते. कोणत्या जिल्ह्याला किती हेक्टर कोणत्या पिकाची लागवड झालेली आहे. त्यातून कमाल व किमान उत्पादन मर्यादा किती असेल, आधारभूत खरेदी केंद्र किती द्यावे लागतील.अशा विविध अंगी योजनांकरिता ई- पीक पाहणी कार्यक्रम नियोजित केला आहे. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा आधार मिळण्याकरिता व तंत्रज्ञान युक्त शेती करण्याकरिता ही पीक पाहणी कार्यक्रम राबविणे काळाची गरज आहे.